जगातील प्रत्येक पर्यावरण विषयक जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाचे पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि चळवळ सुरु करण्यात आली आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि देशात पर्यावरण,पर्यटन विषयावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असून पर्यावरण व पर्यटन केंद्र संवर्धन व जनजागृतीचा प्राथमिक संदेश देत आहे, त्याच बरोबर स्त्रीभ्रूणहत्या, ग्रामीण भागातील प्रश्न, व इतर सामाजिक उमक्रमावर कार्य करत असून ७८ देशातील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरण व पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण श्री. डाॅ. सुयोग धस हे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री, पद्मभूषण लोकपालाचे जनक मा. आण्णासाहेब हजारे व आदर्श गावचे निर्माते मा. पोपटराव पवार त्याचप्रमाणे १०० राष्ट्रपती पुरस्कृत विजेते यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ देशात पर्यावरण जनजागृती करण्याचा मानस आहे. त्यासाठी कमी कालावधी मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभाग घेत आहेत.